स्थापना - २७ मार्च १९३३, चैत्र शु.१ शके १८५५

पारितोषिके

१) ज्या विद्यार्थ्यांनी १२ वी च्या परिक्षेत संस्कृत व गणित विषयात सर्वाधिक गुण मिळविलेले आहेत व पुढेही त्याच विषयात रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. अशा पहिल्या व दुस-या क्रमांकाने येणा-या विद्यार्थ्यांचे लोकमान्य टिळक पारितोषिक निधीतून रोख रकमेचे पारितोषिक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येतात.

२) अनेक निधी दात्यांनी मंडळाकडे विशिष्ठ अशा अटीनुसार देणग्या दिलेल्या असुन त्या अटींमध्ये बसणा-या विद्यार्थ्यांना दरवर्षी रोख रकमेची पारितोषिके दिली जातात. सन २०११-१२ या वर्षात सदर अटीन्वये रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १८ शाळा व १३८ विद्यार्थ्यांना रु. २१,३१६/- ची पारितोषिके देण्यात आली.

३) अन्नदान निधी : मंडळाच्या वसतिगृहामध्ये रहाणा-या विद्यार्थ्यांना भोजन खर्च देण्यासाठी तसेच अन्नदानासाठी काही निधीदात्यांनी देणग्या दिल्या आहेत. त्या देणग्यांच्या व्याजातून व निधीदात्यांच्या अटीनुसार वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सहाय्य करण्यात येते.


मंडळाचे विविध पुरस्कार


१) कै. सौ. सुधा वसंत बडे आदर्श महिला पुरस्कार

            कै. श्री. वसंत वि. बडे यांनी ठेवलेल्या निधीतून कै. सौ. सुधा वसंत बडे यांचे स्मृतीप्रित्यर्थ आदर्श स्त्रियांचे सत्कार करण्यात येतात. संसारात राहून स्वत:च्या कर्तबगारिने समाजाच्या विविध क्षेत्रात यशस्वी स्त्रियांचा शोध घेऊन त्यांचा दरवर्षी सत्कार करण्यात येतो.


२) ७५ वर्षे पूर्ण झालेल्या मंडळाच्या आजीव सदस्यांचा दरवर्षी सत्कार

            वयाची ७५ वर्षे पूर्ण झालेल्या मंडळाच्या आजीव सदस्यांचा दरवर्षी सत्कार करण्यात येतो. शाल, श्रीफळ, पुप्षगुच्छ असे या सत्काराचे स्वरुप असते.


३) संस्कृत विषयप प्रेमी व्यक्तीचा सत्कार

            कै. वासुदेव ग. सहस्त्रबुध्दे निधीतून एका संस्कृतप्रेमी व्यक्तीचा सत्कार करण्यात येतो. स्वत:ला संस्कृत विषयाची आवड आणि संस्कृत विषयाचा विशेष प्रचार करणा-या व्यक्तीची या सत्कारासाठी निवड करण्यात येते.


४) आदर्श विद्यार्थी पुरस्कार

            मडळाच्या ल. वि. केळकर वसतिगहात रहाणा-या ऐका विद्यार्थ्याला दरवर्षी “आदर्श विद्यार्थी“ म्हणुन कै. प्रभाकर विठ्ठल करमरकर व अँड. प्रभाकर गोविंद अभ्यंकर यानी ठेवलेल्या निधीचे व्याजातून रोख रक्कमेचे पारितोषिक देऊन सत्कार करण्यात येतो.


५) गुणगौरव पारितोषिके

            पूर्व प्राथमिक व माध्यमिक इ. ४ थी व ७ वी च्या शिष्यवृत्ती परिक्षेमध्ये शिष्यवृत्ती मिळ्वणा-या विद्यार्थ्यांचा दरवर्षी सत्कार करण्यात येतो.


Designed & Maintained by Aaryak Solutions