स्थापना - २७ मार्च १९३३, चैत्र शु.१ शके १८५५

कै. ल. वि. केळकर वसतिगृह

            गेले ३० वर्षे मंडळाचे वतीने ल. वि. केळकर वसतिगृह चालविण्यात येते. रत्नागिरीतील प्रसिद्ध दूध व्यावसायिक कै. ल. वि. केळकर यांनी वसतिगृह इमारत बांधण्यासाठी मोठी देणगी दिली होती. त्यामुळे वसतिगृहाला कै. ल. वि. केळकर यांचे नाव मंडळाने दिले आहे. विद्यार्थ्यांच्या राहण्यासाठी सुसज्ज अश्या ८ खोल्या असून त्यात १६ विद्यार्थ्यांची राहण्याची उत्तम सोय करण्यात येते. विद्यार्थ्यांची भोजनाची व्यवस्था ’मेसक्लब’ पध्दतीने स्वतः विद्यार्थ्यीच करत असतात. त्यासाठी सुसज्ज असे भोजनगृहही आहे. वसतीगृह हे “संस्कार केन्द्र” म्हणून असावे या दृष्टीने वसतीगृहाची मंडळामार्फ़त सर्व व्यवस्था करण्यात येते.

बहुउद्देशीय सभागृहे

            मंडळाचे इमारतीच्या पहिल्या व दुस-या मजल्यावर अनुक्रमे मातोश्री पार्वतीबाई व पिताश्री शंकर विनायक पटवर्धन सभागृह व भगवान श्री परशुराम सभागृह अशी दोन सभागृह आहेत. ती दोन्ही सभागृह विविध सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक अशा उपक्रमांसाठी उपलब्ध करुन देण्यात येतात. ही सभागृहे सर्व सुखसोयीनी परिपूर्ण असून यापूर्वी या सभागृहामध्ये मंडळाच्या अनेक कार्यक्रमाबरोबरच समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.

            ही दोन्ही सभागृहे लग्न, मुंज, साखरपुडा, वाढदिवस, बारसे, मंगळागौर अशा विविध शुभकार्यांसाठी उपलब्ध करुन देण्यात येतात. मातोश्री पार्वतीबाई व पिताश्री शंकर विनायक पटवर्धन सभागृहामध्ये जवळपास १०० ते १२५ लोकांची बसण्याची व्यवस्था आहे. तर भगवान श्री परशुराम सभागहामध्ये २५० ते ३०० लोक बसू शकतात. या वर्षात सुमारे २० विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊन त्यामधून रु. ३०,८५०/- ची ऐच्छिक देणगी मंडळाला मिळाली.

छायाचित्रे...


Designed & Maintained by Aaryak Solutions